Monday, May 20, 2024
Homeजळगावरुळावरून घसरलेली संसाराची गाडी पुन्हा रुळावर

रुळावरून घसरलेली संसाराची गाडी पुन्हा रुळावर

भुसावळ bhusaval। प्रतिनिधी

लग्नानंतर (After marriage) केवळ आठ महिन्यातच घटस्फोट (Divorced) झालेल्या दांम्पत्यांचे (couple) मनोमिलन (reconciliation) करुन दोघांचा रुळारुन घसरलेल्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा आनोखा प्रयत्न येथील भोरगाव लेवा पंचायत शाखेच्या (Bhorgaon Lewa Panchayat Branch) वतीने करण्यात आला आहे.

- Advertisement -

येथील स्टारलाँन येथे दि. 2 जुुलै 21 रोजी अश्विनी व वर्धन यांचा विवाह झाला होता. लग्नाला 8 महिने झाले पण कुरबुरी व ताणतणाव सुरुच होते. शेवटी अश्विनी माहेरी निघून गेली. 7 मार्च 22 रोजी त्यांचा घटस्फोट सुध्दा झाला. पण अश्विनीचे मन मात्र वर्धनमधेच अडकले होते. शेवटी ‘दिल है के मानता नहि’ प्रमाणे तीने नातेवाईकांना, आपली सासरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली.

सगळ्यात महत्वाचे आई वडीलांची फारशी इच्छा नसताना अश्विनी आपल्या सासरी जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. ती भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेत आली. शेवटी सुहास चौधरी व इतर सर्व पंचांनी एकमताने तीला परत सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला व वर्धन राणे यांच्यांशी बोलून समजावून, आज विभक्त झालेल्या पण मनाने एकरूप असलेल्या जोडप्याचे मिलन घडवून आणले. अशा जोडप्यांपासून समाजातील इतर जोडप्यांनी शिकण्यासारखे आहे.

प्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, सुहास चौधरी, आरती चौधरी, दिगंबर महाजन, मंगला पाटील हजर होत्या. भोरगाव लेवा पंचायत शाखेच्या सामुपदेशन चेअरमन आरती चौधरी यांनी अश्विनीला साडी, चोळी देऊन पेढा भरवून पाठवणी केली. मुलाचे वडील अनिल राणे, आई मिनाक्षी राणे, मंगला भोळे, भारती बर्‍हाटे, चुडामण भोळे, राजेंद्र बर्‍हाटे, लिलाधर चौधरी इत्यादी हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या