Friday, May 3, 2024
Homeधुळेराखीव वनातील अतिक्रमणाचा डाव उधळला

राखीव वनातील अतिक्रमणाचा डाव उधळला

कुरखळी Kurakhaḷi । वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील (Shirpur taluka) भोरखेडा, धनपुर, दहिवद येथील ग्रामस्थांनी (Villagers) व सातपुडा संवर्धन समितीच्या सदस्यांनी (Satpura Conservation Committee) अतिक्रमांधारकांचा (encroachers) मनसुब्याना हाणून पाडून एक आदर्श समाजसमोर उभा केला आहे.

- Advertisement -

परिसरात वनकायद्याचा गैर अर्थ काढून काही लोक राखीव वनातील जंगल भागात अतिक्रमण करण्याचा हेतूने जंगल तोडण्यासाठी रात्री समूहिकपणे एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत व नव्याने जागा साफ सफाई करून शेती काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात, परंतु वनविभाग व असली येथील सातपुडा संवर्धन समिती हे जंगल वाचवण्यासाठी रात्र दिवस गस्त घालत असून परिश्रम घेत आहेत.

गेल्या आठवड्यात झाड झुडपे तोडून अतिक्रमण करण्याचा मनसुभा असलेल्या लोकांना रात्रीच्या गस्तामुळे आळा घालण्यात वनविभागाला यश येताना दिसत आहे.

वन कर्मचारी गस्त करून जंगल संरक्षण करत आहेत. रोज रात्री नांहल्यापाडा, कंज्यापाडा, असली, धनपुर, तांडे, दहिवद येथील जंगल भागात गस्त सुरू आहे. तसेच असली येथील वनहद्दीत वृक्षतोड केलेल्या जागी वनविभाग मार्फत सातपुडा संवर्धन समिती असली येथील स्वयंसेवक यांचा मदतीने नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सामूहिकपणे गस्त करून जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या उपक्रमात सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वनक्षेत्रपाल के डी देवरे, यांचा मार्गदर्शनाखाली वनपाल कपिल पाटील, वनरक्षक मुकेश गुजर, वनरक्षक मनोज पाटील वनरक्षक हेमंत वानखेडे, वनरक्षक राहुल देसले, नेचर कँझर्वेशन फोरम चे योगेश वारुडे , राहुल ईशी, किरण कोळी, पांडुरंग धनगर सरपंच असली, सातपुडा संवर्धन समितीचे अध्यक्ष भुपेंद्र राजपूत, योगु सरपंच, प्रशांत कोळी, कुलदीप ईशी, सुनील वाघ, मयूर कोळी, संजय कोळी, विकास कोळी, भटू कोळी, काशिनाथ कोळी, तुकाराम भिल, दंगल भिल यांच्या सहकार्याने अतिक्रमण रोखण्याचे काम होत आहे.

वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने पाड्या – वस्ती वर जाऊन लोकांना वनसंपत्ती महत्व पटवून अतिक्रमण करणे पासून मन परिवर्तन केले जात आहे. असली गावालगत घनदाट जंगल असून ते टिकवण्यासाठी ग्रामस्थांमधे जनजागृती करण्यासाठी वनविभागाला परिसरासह असली येथील ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या