Friday, November 15, 2024
Homeराजकीयजामनेरमध्ये देशातील पहिले टेलिऑपरेटिंग हॉस्पिटल

जामनेरमध्ये देशातील पहिले टेलिऑपरेटिंग हॉस्पिटल

जामनेर । प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील पीडीत रुग्णांसाठी एनर्जी ड्रिंक असलेले माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांनी त्यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जामनेर शहरात देशातील पहिले टेलीऑपरेटिंग हॉस्पिटलची उभारणी केल्याने त्यांची स्वप्न पूर्ती झाली आहे.

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून या हॉस्पिटलचे उद्घाटन होत असून संपूर्ण नाशिक विभागात तालुक्याच्या ठिकाणी एका छत्रछायेखाली सर्व प्रकारच्या आजारावर उपचार देणारे हे पहिले ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठरणार आहे.

शहरातील बिओटी कॉम्प्लेक्स मधील भव्य ईमारती मध्ये जीएम फौंडेशनच्या माध्यमातून सुरू होणार्‍या या हॉस्पिटलमध्ये 200 खाटांची व्यवस्था असून प्रत्येक बेडला ऑक्सीजन सुविधा आहे. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 35 व्हॅन्टी लेटर सुविधा असून 4अत्याधूनिक ऑपरेशन थिएटर आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या मशनरी आहेत त्याच सर्व अद्ययावत मशनरी जामनेर मध्ये ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध झाले असून या हॉस्पिटलमध्ये एकाच छत्रछायेखाली सिटीस्कॅन, ऍन्जिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदय रोग, ब्लड बँक, तसेच किडनी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डायलेसिस करण्यात येणार असून पॅथॉ लॉजिकल विभाग ,एक्स-रे विभाग, सोनोग्राफी ,सिटीस्कॅन, अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिळणार आहेत.

त्यामुळे आता तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, तसेच विदर्भातील रुग्णांना सुद्धा या हॉस्पिटलमध्ये लाभ घेता येईल. यापुढे आता अतिगंभीर रुग्णांना मुंबई येथे वारी करण्याची गरज नसून जामनेर मध्ये जाता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे .त्यामुळे परिसरातील जनतेला मोठा लाभ होणार आहे.

ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल च्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील रुग्णांना अत्यंत वाजवी दरात मोठी सुविधा उपलब्ध होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन रुग्णांना मोफत उपचार ही दिले जाणार आहेत. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, अशा विविध माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार केले जाणार असून इतर रुग्णांनाअल्पशा दरात सेवा पुरविण्यात येणार आहेत.

जामनेर तालुक्यातील जनतेशी आमदार महाजन यांची नाळ जुळलेली आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याशी ही तसेच जळगाव शहराशीपण भाऊंचे अतूट नाते राहिले आहे .म्हणून आमदार महाजन यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवा बळकट व्हावी म्हणून निरंतर प्रयत्न केल्याचे दिसत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या त्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेले आहे.तालूक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. महाजन यांनी शेवटी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या