Sunday, May 5, 2024
Homeभविष्यवेधकामुकता दर्शविणारे शुक्रवलय!

कामुकता दर्शविणारे शुक्रवलय!

हर एक व्यक्तीतील दोष जन्मजात असतात त्यावर नियंत्रण मिळविणे महा कठीण काम असते. हे दोष मनुष्याच्या स्वभावात दिसून येतात त्यामध्ये मुख्यतः क्रोध, स्वार्थी भाव, अति भावना प्रधानता, विना कारण अत्यंत काळजी, आळशी, थंड प्रवृत्तींचे व अत्यंत कामुक अशा विविध स्वाभाविक मानसिकता असलेल्या व्यक्ती आपल्या सभोताली असल्याचे आपणास माहीत असते.

तसेच काही चांगले गुण सुद्धा असतात हे जलद निर्णय घेणारे अत्यंत चालाख, हुशार, विद्वान, धार्मिक प्रवृत्ती हे सर्व गुण दोष व्यक्तीच्या हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे, हाताचा, बोटांचा व अंगठ्याच्या आकारावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हस्त सामुद्रिकद्वारे अचूक ओळखता येते, त्या व्यक्तीला त्याच्यात असलेल्या जन्मजात दोषांची जाणीवही करून देता येते व हे दोष सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व उपाय पण देता येतात.

- Advertisement -

येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि हे दोष जन्मजात असतात व्यक्तीत असलेले दोष तिच्या जन्म कुंडलीत व हातावर असलेले अत्यंत सहजतेने ओळखता येतात. जन्मजात असलेल्या प्रवृत्तीवर किंवा स्वभाव दोषांवर विजय मिळवणे महाकठीण असते, परंतु त्या व्यक्तीला आपल्यातील दोष माहीत झाल्यावर त्या दोषावर नियंत्रण मिळविण्याचे काम तरुणपणात जरी झाले नाही तरी चाळीशी नंतर त्यांना त्यांच्यामधील दोषामुळे त्यांच्या आयुष्यात किती नुकसान झाले याची जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. परंतु पुढील जीवनात आपल्या स्वभावामुळे झालेल्या चुका सुधारण्याची संधी मात्र असते. स्वभावातील दोष माहीत झाले कि त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक जीवनामध्ये त्यांच्यापासून दुरावलेले, दुखावलेले लोक परत मिळू शकतात व त्यांचे जीवन सुखकर होऊ शकते.

मानवी वृत्ती प्रवृत्तीत असलेले जन्मजात दोष ज्योतिष शास्त्रात व हस्त सामुद्रिक शास्त्रात शुक्र ग्रह प्रेम, प्रणय, रती क्रीडा, शृंगार व सौंदर्य याचा कारक आहे. हस्त सामुद्रिक शास्त्रात शुक्रवलय शुक्र ग्रहावर नसून ते हृदय रेषेच्या वर पहिल्या बोटापासून चौथ्या म्हणजे करंगळीपर्यंत असते. काही वेळेस पहिल्या बोटानंतर दुसर्‍या मधल्या बोटाच्या सुरुवातीला दोनही बोटांच्या मधून व शेवटच्या करंगळीच्या अलीकडे दोन बोटांच्यामध्ये जाऊन थांबते. हे शुक्रवलय अर्ध गोलाकार आकार घेते. त्यामुळेे याला वलय म्हणतात. हे वलय दोन रेषांनी अगर तुटक तुटक असू शकते. तसेच हे शुक्र वलय दुहेरी तिहेरी असते.

शुक्र वलय हे ज्या व्यक्तीच्या हातावर असते त्या व्यक्तीची कामुकता वाढविते थोडक्यात सामान्य व्यक्तींपेक्षा यांच्यातील कामुकता खुप जास्त असते. ह्या व्यक्ती खूप लहान वयातच वयात येतात. खूप लहान वयातच यांची कामवासना तीव्र असते. स्त्री व पुरुषाचा शरीर धर्म कळण्याच्या आतच यांना मिलनाची उत्सुकता असते. त्यादृष्टीने हे कायम प्रयत्नात असतात. शुक्रवलय हातावर असता त्या व्यक्तीच्या हाती संयम राहत नाही. अर्थात शुक्रवलय हातावर येणे किंवा नसणे हे मनुष्याचा हातात नाही. शुक्र वलयाची रेषा स्वयं ब्रह्माकडून रेखाटली गेलेली असते. ती मिटवता येत नाही. ती हातावर उमटू नये अथवा नाहीशी करण्यासाठी मनुष्याकडे कुठलेही उपाय नाही. म्हणून शुक्रवलय असलेल्या व्यक्ती जन्मतःच कामुक घेऊन जन्माला येतात, त्यांच्यातील कामुकता हि हातावर गुरू ग्रह जर शुभ लाभात असेल तर त्या व्यक्तींवर संयम व नियंत्रण असू शकते.

दुसरे असे की घरातील संस्कार लहान वयातच समज आल्यावर त्या मुलांना शरीर धर्माची माहिती देणे, त्यापासून अलिप्त राहण्याच्या सूचना वारंवार देत राहणे, अध्यात्म व संस्कार करणे, पॉर्न वेबपासून अथवा त्यासारख्या संकेतस्थळापासून, मोबाईल अथवा कॉम्पुटरवर बघण्यापासून दूर ठेवणे. बारकाईने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे एवढे मात्र पालकांच्या हाती आहे. शुक्रवलय असलेली मुले प्रौढ वयात आल्यानंतर पालकांच्या नियंत्रणाबाहेर असतात. परंतु लहानपणी वयात येताना केलेले संस्कार निश्चितच कामाला येतात व प्रौढपणी नियंत्रणाच्या बाहेर जाण्यापासून वाचतात.

शुक्रवलय असणार्‍या व्यक्तीत कामुकता अधिक असली तरी त्या व्यक्तीची हुशारी, विद्वत्ता व प्रघल्भता कमी नसते मात्र यांच्या जीवनात प्रेम करण्यात जास्त वेळ वाया जात असल्याने यांचे कामाचे तास कमी होतात व यांच्या जीवनात त्यामुळे व्यवसायातील लक्ष कमी झालेले दिसते. त्याचा त्यांच्या चारित्र्यावर व आर्थिक बाबींवर सुद्धा परिणाम होत असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे शुक्रवलय हातावर असणार्‍या व्यक्तीवर कामुकतेच्या प्रवृत्तीने विजय मिळवलेला असतो. त्यामुळे ज्या तरुण मुलांच्या हातांवर शुक्रवलय आहे, त्यांना वेळीच सामाजिक बंधनांची व शरीरशास्त्राची माहिती देऊन जास्तीत जास्त या दोषापासून परावृत्त केले पाहिजे. शुक्र वलय हे स्त्री व पुरुष या दोघांच्याही हातावर असू शकते.

सोबत दिलेल्या चार हातांच्या छायाचित्रांवर नंबर 1 बाणाने शुक्र वलय दाखविले आहे व नंबर 2 बाणाने हातावरील पहिली आडवी रेषा म्हणजे हृदय रेषेच्या वर तुटक तुटक रेषेने झालेले वलय ज्याला हस्त सामुद्रिक शास्त्रात शुक्र वलय म्हणून ओळखले जाते त्यांचे चारही हातावरील बोटांकडे वर्तुळाकार झालेल्या रेषा म्हणजेच वलय प्रत्यक्ष हातांच्या फोटोवरील दाखविले आहे.

प्रसिद्ध अभिनेता अजुर्न कपूर याच्या हातावर शुक्रवलय आहे. शुक्रवलय असल्यामुळे त्याचे नाव 20 वर्षाने मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. वर नमूद केल्याप्रमाणे शुक्रवलयामुळे निर्माण झालेल्या जन्मजात वृत्तीमुळे व्यक्तीची मानसिकता कुंठित होऊन तो अशा प्रकारच्या नात्याचा स्वीकार करत असतो. शुक्रवलयामुळे निर्माण होणारी ही भावना व वृत्ती प्रवृत्ती वयाच्या 40 नंतर कमी होत जाते, असा माझा अनुभव आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या