Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारबारावीच्या परीक्षेत जिल्हयाचा ९५.६३ टक्के निकाल

बारावीच्या परीक्षेत जिल्हयाचा ९५.६३ टक्के निकाल

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज इयत्ता (hsc) बारावीचे निकाल ऑनलाईन (Online) जाहीर करण्यात आले. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ९५.६३ टक्के लागला.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयात इयत्ता बारावीसाठी १६ हजार ६६३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यात ९ हजार २५३ विद्यार्थी तर ७ हजार ४१० विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी १५ हजार ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ८ हजार ८१३ विद्यार्थी तर ७ हजार १२३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. जिल्हयाचा निकाल ९५.६३ टक्के लागला.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १५ हजार ६६९ नियमीत तर २६७ पुनर्परिक्षार्थींचा समावेश होता. नियमीत विद्यार्थ्यांचा निकाल ९५.७२ टक्के तर पुनर्परिक्षार्थींचा निकाल ९७.०९ टक्के लागला.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

नंदुरबार जिल्हयात विज्ञान शाखेत ८ हजार ४९२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४ हजार ५५० विद्यार्थी व ३ हजार ८६० विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.०३ टक्के लागला.

कला शाखेचा ९१.९१ टक्के निकाल

नंदुरबार जिल्हयात कला शाखेत ६ हजार ७२८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६ हजार १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३ हजार ४१८ विद्यार्थी व २ हजार ७६६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. कला शाखेचा निकाल ९१.९१ टक्के लागला.

वाणिज्य शाखेचा ९८.०७ टक्के निकाल

नंदुरबार जिल्हयात वाणिज्य शाखेत ८८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४७२ विद्यार्थी व ३९३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागला.

व्होकेशनल अभ्यासक्रम

जिल्हयात व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी २२१ विद्यार्थ्यांपैकी २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १८७ विद्यार्थी तर २३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमाचा निकाल ९५.०२ टक्के लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या