Thursday, May 2, 2024
Homeनाशिकगॅस सिलिंडर च्या स्फोटामुळे झोपडी जळून खाक

गॅस सिलिंडर च्या स्फोटामुळे झोपडी जळून खाक

नाशिक | Nashik

उमराणे (ता. देवळा) (Umrane) येथे गॅस सिलिंडर च्या स्फोटाने झोपडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. येथील बाबा नगर परिसरात सुनील माळी (Babita Mali) यांच्या घरी ही दुर्दैवी घटना घडली. गॅसच्या स्फोटामुळे (Gas explosions) आग लागून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाचा खून

यामध्ये बारा वर्षाच्या मुलीसह एक वृद्ध महिला भाजून जखमी आहेत. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जखमींमध्ये सपना पोपट माळी आणि जिजाबाई महादू माळी यांचा समावेश असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात (Government hospitals) उपचार सुरू आहेत.

येथील माळी हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात, ते काही कामानिमित्त बाहेर गेले असता, हा प्रकार घडला.

वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार

सिलिंडरच्या (cylinder) रेग्युलेटरमधून अचानक आग भडकत ही आग इतरत्र पसरली. आग पसरल्यामुळे घरातील सर्व वस्तू आणि घरकुल बांधकामासाठी घेतलेले बचत गटाचे पैसे या आगीत जळून खाक झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तू व आधार कार्ड बँक पासबुक सेशन कार्ड आधी महत्त्वाची कागदपत्रंही आगीत जळाली. यामुळे माळी परिवार उघड्यावर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या