Monday, May 20, 2024
Homeजळगावमानव कल्याणाचा विचार हाच बौद्ध साहित्याचा केंद्रबिंदू!

मानव कल्याणाचा विचार हाच बौद्ध साहित्याचा केंद्रबिंदू!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बौद्ध साहित्य (Buddhist literature) हे सर्वांना जवळ करणारे साहित्य आहे. प्रेमाच्या आणि कारुण्याच्या माध्यमातून माणसांना जोडणारे साहित्य आहे. मानवाचा कल्याणाचा (Human welfare) विचार हाच बौद्ध साहित्याचा केंद्रबिंदू (Buddhist literature) आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बौद्ध साहित्य निर्मितीकडे साहित्यिकांची वाटचाल झाली पाहिजे, असे प्रतिपादन तिसर्‍या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे (3rd State Level Buddhist Literature Conference) अध्यक्ष डॉ.यशवंत मनोहर (Dr. Yashwant Manohar) यांनी केले. बबन कांबळे साहित्य नगरी डॉ. आंबेडकर मार्केटजवळील लेवा भवनात भरलेल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

- Advertisement -

डॉ. यशवंत मनोहर पुढे म्हणाले की, जाती आणि चातुवर्ण ही विषमतेचे किल्ले मजबूत करणारी हिंस्रसामग्री आहे. बौद्ध साहित्यिक आणि आंबेडकरवादी साहित्यिक या संज्ञा वेगवेगळे असले तरी त्यांचे मूल्य संविधान एकच आहे. सर्वांना समान मानवाधिकार ही त्याची बैठक एकच आहे. विषमतेची निर्मिती कोणीतरी करीत असतात. विषमता आपसूक आकाशातून पडत नाही व जमिनीतून स्वतःहून उगवत नाही. विषमता कोणीतरी निर्माण करीत असतात. वावर विषमताने कसले जाते. विषमतेचे निरंतर आणि विक्रमी पीक येईल याची काळजी कोणीतरी घेत असतात.

विषमता ही नैसर्गिक घटना नसते. म्हणून ही विषमता नष्ट करण्यासाठी बौद्ध साहित्यिकांनी आपल्या लेखणीला वळण दिले पाहिजे आणि बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने समतावादी विचार वाचकांपर्यंत पोचविले पाहिजे. बौद्ध साहित्यकांनी 85 टक्के बहुजन समाजाला एकत्रित करण्याची गरज आहे, असे त्यांनी असांगितले. संमेलनाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड,डॉ. प्रदीप आगलावे आणि डॉ. धनराज डाहट आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन डॉ. अशोक सैंदाणे व विनोद सपकाळे यांनी केले. तर आभार धनराज मोतीराय यांनी मानले. धम्मजागृती रॅलीचे प्रमुख चैतन्य नन्नवरे, संविधान सन्मान रॅलीचे प्रमुख सतीश गायकवाड, बौद्ध शिक्षक संघाचे प्रतिनिधी संजय निकम, बी.टी.सपकाळे, कार्यवाह समितीचे प्रमुख डॉ.अशोक सैंदाणे, अर्थ समितीचे सहसचिव विवेक सैंदाणे, राजेंद्र पारे, भटू जगदेव, नवनाथ रणखांबे, महिला समन्वय समितीच्या प्रमुख संगीता साळुंखे आदी उपस्थित होते.

बौद्ध साहित्य चळवळ गतिमान!

या साहित्य संमेलनाची समाजाला नितांत गरज होती म्हणून आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी बहुजन समाज उपस्थित झाला आहे. या संमेलनासाठी 45 सभा घेतल्या असून या सभांच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी साहित्य संमेलनाला आहे. या तिसर्‍या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध साहित्याची चळवळ गतिमान होणार असल्याचा विश्वास आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. भरत शिरसाठ यांनी व्यक्त केला.

डॉ.आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्राचे उद्घाटन

बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर सणसवाडी मार्फत आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्राचे उद्घाटन डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते करण्यात आले. विचार मंचावर स्वागत अध्यक्ष भरत शिरसाठ, डॉ.धनराज डाहट, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, साहित्यिक जयसिंग वाघ, प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, बौद्ध साहित्य प्रसाद संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, उपाध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष विद्या भोरजारे, केंद्रीय सदस्य बि.आर.पंचांगे, कांतीलाल भडांगे, ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे, कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सतीश मोरे, शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख धनराज मोतीराय, प्राध्यापक समन्वय समितीचे प्रमुख डॉ. संदीप कोतकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या