Friday, May 3, 2024
Homeनाशिकहरितक्रांतीची गरज : जगताप

हरितक्रांतीची गरज : जगताप

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

हरितक्रांतीचे जनक ठरलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांची जयंती महानगरपालिकेत साजरी करण्यात आली.

- Advertisement -

आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त सुहास जगताप (Deputy Commissioner Suhas Jagtap) यांच्या हस्ते स्व. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन केले गेले.

मनपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त जगताप यांनी हरित क्रांतीसह स्व. नाईक यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हरित क्रांती (Green Revolution) काळाची गरज बनली आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धन (Conservation of trees) करण्याचे अभियान प्रत्येक नागरीकाने राबविण्याची आवश्यकता असल्याचे जगताप यांनी सांगितले. कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) महादेव घाट मंदिर परिसरात मनपा अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण (tree plantation) करून जनतेस पर्यावरणपूरक वृक्षलागवडीचा संदेश दिला गेला.

कार्यक्रमास उपायुक्त सतिश दिघे, मुल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी हेमलता डगळे, महिला बालविकास अधिकारी डॉ. श्रिया देवचक्के, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, अनिल पारखे, सचिन महाले, सुनील खडके, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, नगरसचिव साजिद अन्सारी, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख आदी अधिकारी व सेवक उपस्थित होते.

कृषीदिन (Agriculture Day) व डॉक्टर्स दिनाचे (Doctor’s Day) औचित्य साधून मनपा प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी करोना संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या कार्याविषयी माहिती देवून सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास विधी विभाग प्रमुख बाळू धोंडगे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल अहमद जान मोहम्मद, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, नीलेश जाधव, बाजीराव सोंळकी, केदा भामरे, अनिल सांगळे, प्रदीप जोशी, शाम अहिरराव, शरद मोरे, गौरव पवार, सचिन पिंगळे, उदय अहिरे, मिलींद जगताप, विशाल मोरे, आप्पासाहेब अहिरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या