Friday, May 3, 2024
Homeजळगावजात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

जळगाव – Jalgaon

राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठया प्रमाणात निवडणुकीस उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता 25 ते 27 डिसेंबर, 2020 या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी 9.45 ते 6.15 या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहील. असे सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या