Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरण तापले

प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरण तापले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

2022 पंचवार्षिक महापालिका निवडणुकीसाठी NMC Upcoming Elections काल प्रारुप प्रभाग रचना Ward Structure जाहीर करण्यात आली. यानंतर विविध राजकीय पक्षांसह इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. दुपारी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच इच्छुकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रभाग क्रमांकासह भावी नगरसेवक असे लिहून त्या समर्थकांच्या मार्फत लोकांमध्ये वायरल केली. यामुळे प्रभागरचना जाहीर होताच राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मागील एक वर्षापासून नाशिक महापालिका निवडणुकीची तयारीला वेग आला होता. शहरातील विविध भागात इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली होती. करोना काळातदेखील मोठ्या प्रमाणात समाजसेवा करून आपण या भागातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत काही इच्छुकांनी दिले होते, मात्र वाढ कटिंगकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

काल सकाळी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने शहरातील 44 प्रभागांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचना जाहीर केल्यानंतर त्वरित राजकीय वातावरण तापले. शहरातील सहा विभागात इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभागाच्या चतुर्सीमा प्रमाणे व प्रभाग क्रमांक टाकून त्याच्यात भावी नगरसेवक अशा टाकून ते एकमेकाला पाठवत होती.

दरम्यान महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली असली तरी महिला आरक्षणासह इतर आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे अद्याप अनेकांनी आपला प्रभाग कोणता व आपण कुठून व कोणत्या पक्षातून लढणार याबाबत कोणत्याही प्रकारे स्पष्ट उल्लेख केलेले दिसून आले नाही. दरम्यान शहरातील काही प्रभागात अत्यंत काट्याची लढत होणार आहे. 2012 ते 2017 या पंचवार्षिक काळात महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती तर 2017 मध्ये सत्तांतर होऊन एकहाती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली. आता 2022 मध्ये ती कोणाकडे जाणार हे पाहणे गरजेचे आहे.

2012 ची पुनरावृत्ती होणार असून महापालिकेत मनसेनेची सत्ता येणार आहे. मनसेना सर्व 44 प्रभागात आपले उमेदवार उभे करणार आहे. युवकांना यंदा जास्त संधी मिळणार. प्रशासनाने केलेली प्रभाग रचना आमच्यासाठी सोपी जाणार आहे.

दिलीप दातीर, शहराध्यक्ष, मनसेना

नाशिक महापालिकेत यंदा 100 टक्के भगवा फडकणार आणि शिवसेनेचा महापौर होणार यात शंका नाही. प्रभाग रचना चांगल्या पद्धतीने झाली आहे. यंदा युवकांना चांगली संधी आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ते पुन्हा सिद्ध करू.

विनायक पांडे, माजी महापौर

- Advertisment -

ताज्या बातम्या