Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई | Mumbai

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु असून आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti and Mahavikas Aaghadi) उमेदवारांच्या याद्या अंतिम केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी महायुतीमधील भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तब्बल १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर तिढा असून आज यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. अशातच आता नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

भाजपचे (BJP) माजी नगरसेवक व दोन वेळचे सभापती असलेला नाशिक पूर्वमधील एक बडा नेता आज दुपारी १२ वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Sharad Pawar) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचा हा दिग्गज नेता नाशिक पूर्वमधून पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होता. मात्र, पक्षाने याठिकाणी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे हा दिग्गज नेता काहीसा नाराज झाला होता. त्यानंतर या नेत्याने विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी (Candidate) चाचपणी सुरु केली होती. यानंतर आता त्याच्या या चाचपणीला जवळपास यश आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर या दिग्गज नेत्याला पक्षाकडून नाशिक पूर्वमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपची चांगली अडचण होण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या दिग्गज नेत्याला उमेदवारी मिळाल्यास भाजप उमेदवार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.

राजश्री आहिरराव तुतारी फुंकणार?

नाशिकच्या माजी तहसीलदार आणि भाजपच्या नेत्या असलेल्या राजश्री आहिरराव (Rajshree Ahirrao) या देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजश्री आहिरराव या देवळाली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याने याठिकाणाहून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सरोज आहिरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आहिरराव यांचा काहीसा हिरमोड झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राजश्री आहिरराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...