Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत (Pradhan Mantri Gram Sadak Yojana ) येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan )यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली .

- Advertisement -

भाजपचे आमदार सुनील राणे यांनी पंतप्रधान योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू आणि सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, सर्वश्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, प्रशांत बंब, आशीष जयस्वाल यांनी उपप्रश्न विचारले.

- Advertisment -

ताज्या बातम्या