Friday, May 3, 2024
HomeUncategorizedपालकांच्या मदतीवर शाळा उभी

पालकांच्या मदतीवर शाळा उभी

येवला। सुनील गायकवाड | Yeola

ग्रामीण भागात (rural area) विद्यार्थ्यांना (students) सर्वाधिक जवळच्या वाटणार्‍या शाळा (school) म्हणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा (Zilha Parishad Primary School) होत. या शाळांंमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जर चांगले शिक्षक (teachers) लाभले आणि विद्यार्थ्यांची प्रगती झाली तर अशा शाळा (school) आणि तेथील शिक्षक पालकांच्या गळ्यातील ताईत होतात.

- Advertisement -

त्यामुळे पालकांना जर लक्षात आले की, शाळेला भौतिक सोई-सुविधा मिळत नाहीत. त्यावळी पालक शाळेसाठी पदरमोड करून आवश्यक साहित्य खरेदी करून देतात. त्यामुळे शाळेला साहित्य भेट देतात. तालुक्यातील नगरसुल (nagarsul) केंद्रात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलेवाडी या शाळेला येथील ग्रामस्थांकडून अनेक भौतिक सोई सुविधा निर्माण करण्यासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे असतो .

शासन अनुदानातून (Government grants) सन 2012 साली विध्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (Drinking water system) व्हावी म्हणून शाळेत बोअरवेल घेऊन जलपरी बसविण्यात आली होती.गेल्या काही दिवसापासून सदर जलपरी खराब झाली होती.त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी , स्वच्छतेसाठी व झाडांसाठी पाण्याची नितांत गरज भासत होती .

शाळेतील मुख्याध्यापक भिवसेन कोपनर यांनी ही समस्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व पालकांकडे मांडली.शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकवर्गणीतून नवीन जलपरी खरेदी करून विद्यार्थ्यांना तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करून दिली.

केंद्रप्रमुख संतोष मुंढे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार उपाध्यक्ष सचिन मोरे,ग्रा.प.सदस्य रावसाहेब खैरनार,बाळू मामा खैरनार, सुरेश बागल, विलास खैरनार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या