Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्याशिरोमणी अकाली दलाने एनडीए सोबतची युती तोडली

शिरोमणी अकाली दलाने एनडीए सोबतची युती तोडली

चंडीगढ़ –

नव्या कृषिविधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाने (एसएडी)

- Advertisement -

एनडीए बरोबरची युती तोडली आहे. पक्षाचे नेते सुखबीर सिंह यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.

कृषी विधेयकांवरून झालेल्या तीव्र मतभेदांमुळे भाजपच्या सर्वात जून्या मित्र पक्षांपैकी एक शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा भाजपासाठी एकप्रकारे धक्का मानला जात आहे. यापूर्वी पक्षाकडून केंद्रात मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता.

मोदी सरकारने नुकतीच कृषी विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतली. या विधेयकांना अकाली दलाचा तीव्र विरोध आहे. एवढेच नव्हे तर पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये पक्ष सक्रीय आहे. या विधेयकांना विरोधासाठी पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा देवून आपला विरोध नोंदविला होता. आता पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाजपासाठी धक्का आहे.

नवे धोरण शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याचा अकाली दलाचा आक्षेप आहे. आधारभूत किंमत कालांतराने हटवली जाईल. त्यामुळे खाजगी कंपन्यांची मनमानी सुरू होईल, असे या पक्षाला वाटते. अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी शेतकर्‍यांना हिताविरूद्ध असलेल्या प्रयत्नांना पाठींबा देऊ शकत नाही. त्यामुळे एनडीएसोबतच्या संबंधांचा आढावा घेत असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. आता पक्षाने आपला निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी अकाली दलाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या