Wednesday, September 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजश्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुले राहणार

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुले राहणार

१६ सप्टेंबरपासून मंदिर बंद ठेवण्याबाबत कुठलीही सूचना प्राप्त नाही; देवस्थान ट्रस्टने केला खुलासा

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून दिनांक १६ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विविध माध्यमे तसेच समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असल्याने नागरिक व भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात फोन कॉल्स व संदेश प्राप्त होत आहेत.

या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात येते की, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर दिनांक १६ सप्टेंबरपासून मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्यापपर्यंत कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन किंवा भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये. नागरिक व भाविकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात यावा.

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी तसेच त्यानंतरही नेहमीप्रमाणे भाविकांसाठी खुले राहणार आहे.

भाविकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांततेने व भक्तिभावाने श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
असल्याने आणि त्र्यंबकेश्वर मंदिराला चार दरवाजे असल्याने असा कोणताही प्रसंग येणार नाही याची दक्षता देवस्थान ट्रस्ट घ्यावी अशी ही मागणी करण्यात येत आहे.

दोन वेळा अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट...