Thursday, May 14, 2026
Homeधुळेशिवरायांचा पुतळा प्रशासनाने पहाटे हलविला

शिवरायांचा पुतळा प्रशासनाने पहाटे हलविला

कापडणे । Kapadane । प्रतिनिधी

शिवजयंतीपासुन महाराष्ट्रभर चर्चेत असलेला धनुर (Dhanur) येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळा (statue) आज दि.27 रोजी अखेर प्रशासनाने (Administration) हलविला (Moved). पहाटे दोन वाजता शेकडोच्या फौजफाट्याने येत पाच वाजता पुतळा काढुन नेण्यात आला. पुतळा नेतांना धनुरसह लोणकुटे, दापुरा येथील ग्रामस्थांच्या (villagers) रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर शिवप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त करत काही काळ देवभाने फाट्यावर रास्ता रोको केला.

- Advertisement -

धनुर येथील ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यालयासमोर दि.19 रोजी गावातील अज्ञातांनी शिवरायांचे स्मारक उभारले. शासनाची परवानगी न घेता (Without permission) शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसविला असल्याचे कारण पुढे करीत, प्रशासनाने सबंधितांना नोटीस बजावण्यास त्या दिवसापासुनच सुरुवात केली. जिल्हा प्रशासनासह (district administration) महसूल व पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना समज देत पुतळा सन्मानाने काढून घेण्याचीही समज दिली होती. परंतु हा पुतळा कोणीही उभारला असला तरी पुतळा काढला जाणार नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी व पदाधिकार्‍यांनी तीव्र विरोध केला होता. यानंतर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector) तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांनी सलग तीन वेळा कलम 144 लावून जमावबंदीचे आदेश काढले. ग्रामपंचायतीच्या सरपंचांना (Sarpanch) नोटिसा दिल्या. पोलीस पाटील संदेश पाटील यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित केले. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक सुरेखा ढोले यांनाही निलंबीत केले. ग्रामपंचायतीला नोटीसा देत दोन दिवसाचा अल्टिमेटम जाहीर केला. तरीसुद्धा पुतळा काढण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता.

आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास धुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे या पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, इतर कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, महावितरणचे कर्मचारी, आरोग्य केंद्राचे कर्मचारी व इतर यंत्रणेसह सह धनुरला दाखल झाले. तब्बल दोन तासानंतर शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा पहाटे 5 वाजुन 10 मिनिटांनी काढला गेला. शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळा (statue) दापुरा- सोनगीर मार्गे नेण्यात येवुन धुळे येथील पॉलिटेक्निक कॉलेजला उतरवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

किरकोळ दगडफेक

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उतरविण्यात येत असतांना काही वेळ तणावाचे (tension) वातावरण होते. ग्रामस्थ व पोलीसांची थोडी शाब्दिक चकमक व किरकोळ दगडफेक वगळता पुतळा शांततेत काढण्यात आला. काही महिलांना अटक करून सोडून देण्यात आले.

ताफा अडविण्याचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दापुरा सोनगीर मार्गे धुळे येथे नेत असताना दापुरा गावात गावातील महिला-पुरुषांनी काहीवेळ गाड्यांसह ताफा(Tafa) अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या किरकोळ दगडफेकीत एका गाडीच्या काचा फुटल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मुंबई- आग्रा महामार्गावर देवभाने फाट्याजवळ देखील काही काळ परिसरातील लोकांनी रस्ता रोको (Stop the road) करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणावर फौजफाट्यासह असलेल्या प्रशासनाने दोघा ठिकाणाच्या आंदोलनस्थळी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगविले.

लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांचा रोष

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न काढण्यावर ग्रामस्थ ठाम होते. परंतु जिल्हा प्रशासनाने पुतळा काढून घेतला. यानंतर लोकांनी काही वेळ घोळका करून सर्वच पदाधिकार्‍याविषयी प्रचंड रोष व्यक्त केला. नेतेमंडळीवर (Leadership) तोंडसुखही घेतले गेले. कापडणे गटाचे जि.प.सदस्य किरण पाटील (ZP member Kiran Patil) यांनी शिवाजी महाराजांचा हाच अश्वारुढ पुतळा सन्मानाने आणि अधिकृतरित्या बसवून दाखवेल अन्यथा मी धनुर गावात आपणास तोंड दाखवणार नाही, असा शब्द यावेळी दिला.

तलवार वाकल्याने शिवप्रेमींची भावना भडकल्याची चर्चा

शिवस्मारक दापुरा मार्गे नेले जात असतांना शिवप्रेमींना शिवरायांच्या हातातील तलवार (Sword) वाकलेली दिसल्याने शिवप्रेमींच्या भावना भडकल्या व गावातुन रोष व्यक्त करण्यात आल्याची आज दिवसभर चर्चा होती. देवभाने फाट्यावरील रास्तारोकोही त्याचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे. शिवरायांच्या प्रतिमेची यातुन विटंबना झाल्याची भावना यावेळी बोलली जात होती. नंतर पोलीस स्टेशनला पोहचल्यावर ही तलवार सरळ करण्यात आल्याचे बोलले जात होते. यात तथ्य असल्यास यातील दोषींवर कारवाई होण्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी बोलुन दाखवली.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Scam : अधिकाऱ्यांची रवानगी तुरुंगात; काजळे, पाटीलला न्यायालयीन कोठडी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळ्याप्रकरणी (MHADA Land Scam) गेल्या आठवडाभरापासून पोलीस कोठडीत (Police Custody) असलेल्या दोन बड्या अधिकाऱ्यांची रवानगी आता...