Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar- Shivsena ) यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सावतानगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेचा ( Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray Abhyasika ) आलेख सतत चढताच राहिला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC )तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेत अभ्यासिकेच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

- Advertisement -

या अभ्यासिकेचा कल्पेश दिलीप चव्हाणने पोलिस उपनिरीक्षक तर अजिंक्य रवींद्र सूर्यवंशी याने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवून अभ्यासिकेचे नांव रोशन केले. या दोघांचा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आतापर्यंत या अभ्यासिकेत अभ्यास करून 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांद्वारे शासकीय अधिकारी व अन्य पदांवर नोकऱ्या मिळविल्या आहेत याची आठवण सुधाकर बडगुजर यांनी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना करून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या