Friday, October 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश कुमारांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांना 'त्या' प्रकरणात बजावली...

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश कुमारांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांना ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस; राहुल गांधींनाही फटकारले

नवी दिल्ली | New Delhi

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधींसह (Rahul Gandhi) इंडिया आघाडीच्या खासदारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (गुरुवारी) सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या आंदोलनावरून न्यायालयाने राहुल गांधींना देखील फटकारले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ज्ञानेश कुमार यांच्यासह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस बजावत त्याच्यावर उतर मागितले आहे. तर जंतरमंतरची जागा आंदोलनासाठी नाकारण्यात आल्याने त्यावरून न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता यावर केंद्र सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे. दुसरीकडे न्यायालयाच्या परिसरात काढलेल्या मोर्चावरून राहुल गांधींना फटकारताना न्यायालय म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात समर्थकांसोबत गेले होते त्यावर स्पष्टीकरण द्या, अशा सूचना दिल्या. तसेच न्यायालयाला कोणीही धमकावू शकत नाही, असंही कोर्टाने म्हटले.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सीपीआय नेते डी. राजा आणि इतर अनेक राजकीय नेत्यांचा समावेश होता.

ताज्या बातम्या

देवेंद्र

It’s done bro, everything is exposed!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
मुंबई | Mumbaiदिल्लीसह देशात सध्या निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी देशभरात अनेक आंदोलने...