Saturday, October 17, 2026
Homeदेश विदेशअभिजीत दिपकेंच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, तिरंगा रॅली आधीच अटक होणार?

अभिजीत दिपकेंच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, तिरंगा रॅली आधीच अटक होणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीत सीजेपीच्या प्रमुख नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क परिसरात ही रॅली काढण्याचे नियोजन असून या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ज, १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, या कार्यक्रमावरून पोलीस आणि CJP यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. दिपके यांनी यापूर्वीच आपल्याला ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती.

दिल्ली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस दिल्याचे समजते आहे. आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. दुसरीकडे, दिपके यांनी तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याची भूमिका घेत रॅली काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

- Advertisement -

CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अलीकडेच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर-मंतर येथे तिरंगा फडकवल्याच्या घटनेनंतर त्यांच्यावर नियमभंगाचे आरोप ठेवण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ते सध्या तिहार कारागृहात आहेत. या कारवाईविरोधात CJP ने रस्त्यावर उतरून निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते हातात राष्ट्रध्वज घेऊन आपला विरोध व्यक्त करणार आहेत. दरम्यान, रॅली सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अटक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Rajnath Singh: ‘बांगलादेशच्या धर्तीवर सत्ताबदलाचा प्रयत्न’; राजनाथ सिंहांचा राहुल गांधी आणि CJPवर गंभीर आरोप

अभिजीत दिपकेंचा पोलिसांवर आरोप
गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलीस हेरगिरी आणि आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. अभिजीत दिपकेंनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन आयबी आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा दावा केला. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा नंबर प्लेट नसलेली संशयास्पद वाहनं आणि साध्या वेशातील पोलीस आपला पाठलाग करतात, असाही दावा दिपकेंनी केला. शिवाय दिल्ली पोलीस आपल्याला कधीही ताब्यात घेऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

#WATCH | Delhi Police personnel arrive at the residence of NCP-SCP spokesperson Anish Gawande, where CJP Founder Abhijeet Dipke is staying.

Abhijeet Dipke has called for a ‘Lehra Do Tiranga’ protest at Connaught Place’s Central Park today. https://t.co/kCdkGpUDJU— ANI (@ANI) October 16, 2026

दुसरीकडे, सेंट्रल पार्क परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली महानगरपालिकेने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आंदोलनाच्या नियोजनावर आणि कार्यकर्त्यांच्या एकत्र येण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादण्यास नकार दिल्याचे सांगितले जात असले, तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस सतर्क आहेत.

ताज्या बातम्या

पुण्यातील लोहगड हत्याप्रकरणात मोठी घडामोड; उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील, 5,053...

0
पुणे । Pune सुरुवातीला अपघाताचा आभास निर्माण करून अत्यंत कटकारस्थान रचून घडवून आणलेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी...