Tuesday, May 7, 2024
Homeधुळेभाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले मनपात 65 प्लसचे टार्गेट

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले मनपात 65 प्लसचे टार्गेट

धुळे Dhule । प्रतिनिधी

महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत (elections) लोकसभेच्या (Lok Sabha) 45 तर विधानसभेच्या (Legislative Assembly) 200 हून अधिक जागा जिंकण्याचा (win the seat) संकल्प भाजपाने (Sankalp BJP) केला आहे. त्यासाठीच कार्यकर्त्यांचे संघटन (Organization of workers) आणि बळकटीकरण सुरु आहे, असे सांगतांनाच धुळ्यात यापुर्वी महापालिकेसाठी (Municipal Corporation) 50 प्लसची घोषणा करण्यात आली होती. त्या जागा जिंकून मनपावर सत्ताही मिळाली. आता 65 प्लसची तयारी ठेवा असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष (State President of BJP) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर बावनकुळे हे राज्याच्या दौर्‍यावर निघाले असून आज त्यांनी धुळे जिल्हा दौरा केला. प्रारंभी सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे शहरातून अत्यंत उत्साहात स्वागत करुन मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. कार्यक्रमाला खा.डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, संजय शर्मा, भिमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपा भक्कमपणे काम करीत आहे. गरीब आणि शेतकर्‍यांसाठी राबविलेल्या योजनांमुळे जनतेला खर्‍या अर्थाने दिलासा मिळाला आहे. केंद्रातील नेतृत्व आणि राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कार्यकर्त्यांच्या संघठनावर भर देण्यात येत असून त्यासाठीच हे संवाद दौरे सुरु केले आहेत.

आगामी काळात ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका जिंकण्यासह राज्यात 45 खासदार तर 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. यासाठी भाजपाने एक कार्यकर्ता 20 घर हे अभियान सुरु केले असून यात एका कार्यकर्त्याला 20 घरे सांभाळायची आहेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो आहे की नाही हे पाहतांनाच यासाठी सर्वोतोपरी मदत करायची आहे. धुळ्यातही आगामी निवडणुकीत 65 प्लस नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या