Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ९१८३

जळगाव : जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ९१८३

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह 334 रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 9183 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 90, जळगाव ग्रामीणमधील 14, भुसावळ येथील 18, अमळनेरातील 19, चोपडा येथील 7, पाचोर्‍यातील 40, भडगावमधील 14, धरणगावातील 32, यावल येथील 1, एरंडोलमधील 9, जामनेरातील 32, रावेर येथील 7, पारोळ्यातील 2, चाळीसगाव येथील 40, मुक्ताईनगरातील 7 आणि परजिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 5834 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात 204 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सध्या 2899 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध ठिकाणचे एकूण 10 रुग्ण दगावले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात 4 रुग्ण, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 6 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये जळगाव शहरातील 66 वर्षीय महिला, तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुुक्यातील 64 वर्षीय पुरुष, यावल तालुक्यातील 70 व 72 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष, पाचोरा तालुक्यातील 64, 65 व 75 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या