Friday, May 3, 2024
Homeजळगावआदिवासी क्रांतीकारकांच्या बलिदानापासून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार...

आदिवासी क्रांतीकारकांच्या बलिदानापासून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

जळगाव jalgaon प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात (Indian freedom struggle) सहभागी झालेल्या आदिवासी क्रांतीकारकांच्या (Tribal revolutionaries) बलिदानापासून (sacrifice) तरुण पिढीने (younger generation) प्रेरणा (inspiration) घेत देशप्रेमाची भावना प्रत्यक्ष कृतीतून उतरवावी असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित (Tribal Development Minister Dr.Vijaykumar Gavit) यांनी केले. 

- Advertisement -

   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ८ ऑक्टोबर रोजी ‘स्वातंत्र्य लढयातील आदिवासी नायकांचे योगदान’ या विषयावर अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाचे उद्घाटन करतांना डॉ.गावित बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा मुंडा जनजाती केंद्रीय विद्यापीठ, राजपिपला, गुजरातचे कुलगुरू प्रा. मधुकर पाडवी यांची विशेष उपस्थिती होती. या संमेलनात वक्ते म्हणून जनजाती आयोगाचे संयोजक वैभव सुरंगे, जनजाती आयोगाचे संशोधन अधिकारी आर.एस. मिश्रा, किनवट येथील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रकाश टारपे., कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.  

     डॉ.गावित म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचा सहभाग मोठा राहिलेला आहे.  त्यांची माहिती व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.   त्या त्या भागात आदिवासींनी इंग्रजांविरुध्द संघर्ष केला. या कार्यक्रमातून केवळ आदिवासी क्रांतीकारकांची केवळ आठवण काढून उपयोग नाही तर त्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. रावलपाणी आणि धरणगाव येथे लवकरच स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे डॉ.गावित यांनी सांगितले.

प्रा.मधुकर पाडवी यांनी आदिवासींकडे शिक्षण, पैसा आणि संसाधने नसतांनाही स्वातंत्र्य लढा, रुढी परंपरा आणि शोषक इंग्रज अशा तीन पातळ्यांवर संघर्ष केला.  सन १७६० आणि त्या आधी मोघल काळ, रामायण काळापासून जनजातिंमधील नायक लढलेले आहेत.  आदिवासी महिलांचेही योगदान मोठे राहिलेले आहे.  तरुणपिढीपर्यंत हा इतिहास नेणे गरजेचे आहे.   

          राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे संशोधन अधिकारी आर.एस.मिश्रा यांनी आयोगाच्या कार्याची माहिती देतांना जनजाती संरक्षणासाठी आयोग कटीबध्द असल्याचे सांगितले. वैभव सुरंगे यांनी विदेशी इतिहासकारांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहील्यामुळे त्यांचा हेतू आणि अर्थ अत्यंत चुकीचा होता.  त्यामुळे खरा इतिहास समोर आला नाही.  अशी खंत व्यक्त केली. आदिवासींमधील हजारो क्रांतीकारकांबद्दल लिहीले गेले नाही.  त्यामुळे जनजाती आयोगाने देशातील १२५ विद्यापीठांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन त्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आपआपल्या भागातील आदिवासी क्रांतिकारकांविषयी शोधनिबंध लिहावे व नव्याने मांडणी करावी असा हेतू असल्याचे सांगितले.   

          अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाला मोठी परंपरा असून जात, धर्म, भाषा, प्रांत भेद विसरुन सर्वजण सहभागी झाले होते असे सांगितले. आदिवासी समाजाच्या योगदानाची फार मोठी नोंद झाली नाही. स्थानिक पातळीवर अनेक आदिवासी इंग्रजांविरुध्द लढले जल, जंगल आणि जमीनीचे संरक्षण आादिवासी समाजाने केले आहे.  जेव्हा या विषयी इंग्रजांनी कायदे केले तेव्हा त्यांनी इंग्रजाविरुध्द संघर्ष केला  असेही कुलगुरु म्हणाले. 

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्याापीठ करीत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र महाजन यांनी केले. आभार प्रा.अमरदीप पाटील यांनी मानले. यावेळी आरआरआर या चित्रपटातील गीत तसेच जनजाती आयोगाचा लघुपट दाखविण्यात आला. 

या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनातील विजेत्यांना अति‍थींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यामध्ये समाजकार्य महाविद्यालयची विद्यार्थिनी सुनीता बहिरम हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले. 

विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे सचिन जांभुळे व प्रवीण ठाकरे यांना विभागून व्दितीय आणि आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या प्रिती गावित व रोशनी पावरा यांना विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषीक देण्यात आले.  परिक्षक म्हणून प्रा.पुष्पा गावित, डॉ.योगेश महाले,  डॉ.अजय पाटील व जैलसिंग पावरा यांनी काम पाहिले.  

  त्याआधी सकाळी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल, बाबा तिलक मांझी, बाबुराव पुल्लसुर, खाज्या नाईक, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, , उमाजी नाईक, तेजा भिल, देवाजी राऊत, संत गुलाम महाराज, दशरीबेन, धरतीआबा उलगुलान, राणी गायडिनलू आदी क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. यासोबतच विद्यापीठाने घेतलेल्या पोस्टर स्पर्धेतील ३५ पोस्टरही या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या