Thursday, May 2, 2024
Homeनगररात्रीच्यावेळी लुटणारी टोळी शस्त्रांसह जेरबंद

रात्रीच्यावेळी लुटणारी टोळी शस्त्रांसह जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्यावेळी शस्त्रांचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणारी टोळी शस्त्र व मुद्देमालसह एक तासात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले. साई प्रदीप ठोसर (वय 19, रा. अमित नगर, केडगाव), शिवप्रसाद नारायण शिंदे (वय 22 रा. एकता कॉलनी, नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. तर अक्षय साबळे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. रामवाडी) हा पसार झाला आहे.

- Advertisement -

वाळुंज बायपास ते आरणगाव बायपास दरम्यान 6 मे रोजी रात्री उशिरा ट्रक चालकाला लुटले होते. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचे रात्रगस्त करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. तीन आरोपींपैकी दोन आरोपींना तेथे जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी लुटमार करताना जागीच पकडले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक लोखंडी कत्ती, अठराशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

आरोपी सराईत गुन्हेगार असून शिवप्रसाद नारायण शिंदे, याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी साईप्रदीप ठोसर, विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चौकशीत दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सहाय्यक निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पो.ना. बाळू कदम, पो.कॉ. कमलेश पाथरुट, विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे, संदीप जाधव, सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे, विकास शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या