Friday, May 3, 2024
Homeनगरनिमगाव वाघा येथून दुचाकीची चोरी

निमगाव वाघा येथून दुचाकीची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जाधव मळ्यातून भरदुपारी अज्ञात चोरट्याने एक दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती रामभाऊ वाबळे (वय 70 रा. पिंपळगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांची दुचाकी (एमएच 16 एआर 9771) घेऊन निमगाव वाघ येथील जाधव मळ्यात गेले होते. त्याठिकाणाहून दुपारी दोन ते चार यावेळेत दुचाकी चोरीला गेली असल्याचे वाबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या