Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत - काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा निर्वाळा

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा निर्वाळा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेच्या निवडणुका एकत्रच लढवणार आहोत, असा निर्वाळा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी येथे दिला.

- Advertisement -

विधानसभेच्या विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात बेबनाव निर्माण झाला आहे. विदर्भातील काही जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी हक्क सांगितला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही दोन्ही पक्षातील वाद कायम आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपला आग्रह सोडण्यास तयार नसल्याने ठाकरे गट नाराज आहे. आघाडीतील हा राजकीय बेबनाव दूर करण्यासाठी रमेश चेन्नीथला यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात कोणताही वाद नाही. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चा करत आहेत. जागा वाटपाची ही चर्चा येत्या एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि महाविकास आघाडीची प्रकृत्तीही उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीनंतर चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली.

दरम्यान, आज दुपारी टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे हे त्यांनी जाहीर करावे, असे आम्ही सातत्याने विचारत होतो. पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून सरकार जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूतच्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूतसह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत.

पांचज्यन या आरएसएसच्या मुखपत्राने बाबा सिद्दीकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, दाऊद असो किंवा देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपमध्ये प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात आणि संघही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपमध्ये आले. ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपमध्ये घेतले. त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजप सरकारबरोबर बाबा सिद्दीकी आले, एकनाथ शिंदे आले आणि ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही?.आता बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपला चालते. भाजपचे आणि संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

काँग्रेसच्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सिताक्का, टी. एच. सिंग देव, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...