Friday, May 3, 2024
Homeजळगावमालमत्ता करात कोणतीही दरवाढ नाही

मालमत्ता करात कोणतीही दरवाढ नाही

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरातील मिळकतींचे फेरमूल्यांकन (Revaluation of income) करण्यात आले असून त्यानुसार कर आकारणी (Taxation) करण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही करवाढ (Tax increase) केलेली नाही. किंवा वार्षीक भाडे मूल्यांकनामध्ये (Annual rent assessment) कोणतीही वाढ केलेली नसल्याचा खुलासा (Revealed) मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी (Municipal Commissioner Satish Kulkarni) यांनी केला.

- Advertisement -

शहरातील दर पाच वर्षातून फेरमूल्यांकन होणे अपेक्षीत आहे. मात्र जळगाव महापालिकेतर्फे 17 वर्षानंतर फेरमूल्यांकन करण्यात आले असले तरी नागरिकांना याचा अतिरीक्त बोजा नाही. कारण यावर्षी बांधकाम झाले त्या वर्षाच्या दरानूसार आकारणी करण्यात आली आहे. फेरमूल्यांकनाच्या सर्वेक्षणासाठी 2016-17 मध्ये अमरावती येथील स्थापत्य कंपनीला मक्ता देण्यात आला आहे.

घरोघरी जावून त्यांनी मोजणी केली असून त्यानुसारच कर आकारणी केली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परंतू मालमत्ता करात वाढ का झाली असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होत आहे. कारण आधीच्या बांधकामात वाढीव बांधकाम असेल अशा मिळकत धारकांवर कर आकारणी करण्यात आली आहे.

जळगाव शहरात यापूर्वी 97 हजार मिळकती होत्या. सर्वेअंती 1 लाख 18 हजार मिळकती असल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 हजार मिळकतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळी उपायुक्त प्रशांत पाटील, प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी उपस्थित होते.

नोटीसीनंतर हरकतींसाठी 21 दिवसांची मुदत

फेरमूल्यांकनानूसार कर आकारणीची नोटीस मिळाल्यानंतर हरकत घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्यांना हरकत असेल त्यांनी अर्ज करुन शंकांचे निरसण करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या