Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक रोड परिसरात 'भारत बंद'ला प्रतिसाद नाही

नाशिक रोड परिसरात ‘भारत बंद’ला प्रतिसाद नाही

नाशिकरोड l Nashik road (प्रतिनिधी)

शेतकरी विरोधात केंद्र शासनाने जे कायदे लागू केले आहे. त्याला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीने ‘भारत बंद’चे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

परंतु या बंदला नाशिक रोड परिसरात काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी येथील बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी पुतळा चौकात शेतकरी विरोधी काळ या कायद्याची होळी करण्यात आली.

या प्रसंगी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, रमेश आवटे, अशोक खालकर, बळवंत गोडसे, केशव बोराडे, सुदाम बोराडे, सुनील बोराडे, शांताराम भागवत, मनोहर कोरडे, जगन आगळे, नंदू सोनवणे, रामनाथ भागवत, मधुकर सातपुते, नाना नागरे, बाळासाहेब भोर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या