Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात 'इतके' टक्के पाणीसाठा शिल्लक

जिल्ह्यात ‘इतके’ टक्के पाणीसाठा शिल्लक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात यंदाच्या मोसमात सर्व दूर समाधानकारक पावसाबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीही (heavy rain) देखील झालेली आहे.

- Advertisement -

त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (farmers) समाधानाची बातमी आहे. जिल्ह्यातील विविध मोठे प्रकल्प व मध्यम प्रकल्प अशा एकूण 24 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३४ हजार ३०४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रातील उन्हाळी हंगाम (Summer season) व पिण्याच्या पाण्याची (drinking water) परिस्थिती समाधानकारक राहणार असे चित्र आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मोसमात अतिवृष्टी झाली तर पूर्व भागात समाधानकारक पाऊस यावर्षी झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी काही भाग वगळता समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम समाधानकारक राहिला. उन्हाळी हंगामही सुरु आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे प्रकल्प मिळून एकूण २४ प्रकल्प आहेत.

गंगापूर धरण समूहात चार, पालखेड धरण समूहात 1३ तर गिरणा खोरे धरण समूहात सात असे एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 एकूण 24 प्रकल्प आहेत. यापैकी गंगापूर धरण समूहामध्ये ६४ टक्के इतका पाणीसाठा आहे. पालखेड धरण समूहामध्ये ४२ टक्के पाणीसाठा आहे.गिरणा खोरे धरण समूहात ५२ टक्के इतका पाणीसाठा आहे. एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 अशा 24 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी पहाता ती या वर्षी आतापर्यंत ५२ टक्के इतकी आहे.

प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा पुढील प्रमाणे – दशलक्ष घनफुटामध्ये- गंगापूर (३७६४) ६७ टक्के, कश्यपी (१६९९) ९० टक्के,गौतमी गोदावरी (६७७)३६ टक्के, आळंदी (४४६)५५ टक्के,पालखेड (३०२)४६ टक्के,करंजवण (२६५७) ४८ टक्के,वाघाड (६७२) २९ टक्के, ओझरखेड (१४७२)६९ टक्के,पुणेगाव (३५९) ५८ टक्के, तिसगाव (२२०) ४८ टक्के,दारणा (४९६३)६९ टक्के, भावली (९७१) ६८ टक्के,

मुकणे (४८०४)६६ टक्के,वालदेवी (९५०)८४ टक्के, कडवा (४९०) २९टक्के, नांदूर मध्यमेश्वर (२४८) ९६ टक्के, भोजापूर (१०१) २८ टक्के, चणकापूर( १३३७)५५ टक्के, हरणबारी (६०६)५२ टक्के, केळझर(२५१) ४४ टक्के, नागासाक्या (६८)१७ टक्के, गिरणा (६२६७)३४ टक्के, पुनद (१०९८)८४ टक्के, माणिकपुंज(१२)४ टक्के. एकूण ३४ हजार ३०४ दशलक्ष घन फूट ५२ टक्के.

- Advertisment -

ताज्या बातम्या