Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून 'या' अभिनेत्यावर खास जबाबदारी; 'नॅशनल आयकॉन' म्हणून करणार नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘या’ अभिनेत्यावर खास जबाबदारी; ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून करणार नियुक्ती

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची (Rajkumar Rao) भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणूकीच्या नॅशनल आयकॉन (National Icon) म्हणून निवड केली आहे. त्याची औपचारिक घोषणा ही उद्या (दि.२६ ऑक्टोबर) रोजी करण्यात येणार आहे…

Nilesh Rane : निलेश राणेंचा राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर मंत्री रवींद्र चव्हाणांचे स्पष्टीकरण

राजस्थान, मध्यप्रदेश मिझोराम, छत्तीसगढ, तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आता अभिनेता राजकुमार रावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

तसेच या पाच राज्यांमधील १६१ दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) मतदान करतील, अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मतदान (Voting) करण्याचे आवाहन करतांना अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे.

दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या बसचा अपघात; २५ जण जखमी

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एका औपचारिक समारंभाचे आयोजन करुन राजकुमारच्या नावाची घोषणा आणि त्याचा गौरव केला जाणार जाईल. तसेच गुरुवार (दि.२६ ऑक्टोबर) रोजी हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Reservation : मंत्री गिरीश महाजनांचा मनोज जरांगे पाटलांना फोन; म्हणाले, उपोषण…

- Advertisment -

ताज्या बातम्या