Friday, May 3, 2024
Homeनाशिकराहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने राबवली 'ही' मोहीम

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने राबवली ‘ही’ मोहीम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा कॉंग्रेस (Congress) अनुसूचित जाती विभागाच्यावतीने जय भारत सत्याग्रहाच्या माध्यमातून कॉंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ शालीमार येथे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.

- Advertisement -

शहर कॉंग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती (Scheduled caste) विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी ही मोहिम राबवली.

स्वाक्षरी देताना काहींनी प्रतिक्रिया देखील नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘मोदी हटाव, देश बचाव’, ‘बेरोजगारांना रोजगार द्या… शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या… मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या’, ‘स्वाधार योजनेची रक्कम त्वरित अदा करा’, ‘महागाई कमी करा’, ‘पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) भाव कमी करा’ अशा विविध प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.

यावेळी अॅड. आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, रमेश कहांडोळे, वत्सलाताई खैरे, राजेंद्र बागुल, नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बबलु खैरे, वसंत ठाकुर, अल्तमश शेख, विजय पाटील, स्वप्निल पाटील, हनिफ बशीर, ईशाक कुरेशी, लक्ष्मण धोत्रे, कुसुम चव्हाण, आशा तडवी,

कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

दिनेश निकाळे, अरुणा आहेर, विलासराज बागुल, अमोल मरसाळे, गौरव सोनार, जावेद शेख, अरुण दोंदे, प्रा. प्रकाश खळे, संजय खैरनार, फारुक कुरेशी, आण्णा मोरे, शरद बोडके, अब्दुल बाबा शेख, जावेद पठाण, संतोष हिवाळे, धर्मराज जोपळे, राहुल बागुल, अब्दुल शेख, अशोक शेंडगे, अॅड विकास पाथरे, मनोहर अहिरे,

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दिनेश उन्हावणे, कल्पेश जेजुरकर, अर्जुन पालवे, भास्कर कापडणीस, जी. एल. दलाल, संजय गरुड, सुनंदा जगताप शाहीद शेख, गणेश पोकळे, महेश जंगम, संजय काळे, मुस्ताक सय्यद आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं; पंतप्रधानांचा कार्यकर्त्यांशी संवाद

- Advertisment -

ताज्या बातम्या