Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedPUBG ला पर्याय आहेत 'हे' गेम !

PUBG ला पर्याय आहेत ‘हे’ गेम !

सरकारने काल ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गेम PUBG चा देखील समावेश आहे. यामुळे अनेक PUBG चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र प्ले स्टोअर वर असे काही गेम्स आहे जे PUBG ची ऐवजी खेळले जाऊ शकता. चला जाऊन घेऊयात त्या गेम्स बद्दल…

Call of Duty: Mobile

- Advertisement -

Call of duty हा कॉम्प्युटरवर खेळला जाणारा प्रसिद्ध गेम आहे. त्यानंतर call of duty मोबाईल व्हर्जन लॉन्च करण्यात आले. या गेम ला आतापर्यंत ५० लाखाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले असून प्ले-स्टोअरवर रेटिंग ४.५ इतकी आहे.

Garena Free Fire : Rampage

Garena Free Fire गेम हा जवळपास PUBG सारखाच आहे. मात्र ग्राफिक्सच्या बाबतीत सरासरी आहे. या गेमला आतापर्यंत ५० लाखाच्या वर लोकांनी डाऊनलोड केले आहे. तर या गेमची प्ले-स्टोअरवर रेटिंग ४.१ इतकी आहे.

Fortnite

Fortnite हा गेम PUBG प्रमाणेच आहे. या गेमला आतापर्यंत १० लाखाच्या वर लोकांनी डाऊनलोड केले आहे. तर या गेमची प्ले-स्टोअरवर रेटिंग ४.४ इतकी आहे

Knives Out

Knives Out हा गेम २०१७ मध्ये लॉन्च केला होता. या गेमचे ग्राफिक्स PUBG प्रमाणेच असून यामध्ये देखील PUBG सारखेच १०० प्लेअर्स सोबत घेली शकता. मात्र या गेमला प्ले-स्टोअरवर ३.४ इतकी रेटिंग आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या