Monday, September 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमराठी माणसाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली- उद्धव ठाकरे

मराठी माणसाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली- उद्धव ठाकरे

*5 जुलैला कार्यक्रम सभा की मोर्चा; सर्वांशी चर्चा करून घेणार निर्णय

मुंबई

- Advertisement -

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. 5 जुलैला आम्ही विरोधाचा मोर्चा काढणार होतो. पण आता 5 जुलै रोजी काय करायचं, मोर्चा काढायचा की सभा घ्यायची याबद्दल सर्वांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

एखादे संकट आल्यानंतर मराठी माणूस जागा होतो. पण आता आपण जागे झालोय, एकत्र आलोय. आता मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हिंदीचा जीआर मागे घेतला गेला. पण आता मराठी माणसाची ही एकजूट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...