Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील ५ केंद्रांवर १८ वर्ष पूर्ण केलेल्यांना मिळणार लस

जिल्ह्यातील ५ केंद्रांवर १८ वर्ष पूर्ण केलेल्यांना मिळणार लस

नाशिक । प्रतिनिधी

वय वर्ष अठरा पूर्ण केलेल्यांना आजपासून (दि.१) करोना लस दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्र सुरु केली जाणार आहे. नाशिक महापालिका दोन, ग्रामीण भागात दोन व महापालिला हद्दित एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले अाहे. त्यासाठी दहा हजार लसींंचा स्टाॅक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लसीचा तुटवडा लक्षात घेता सध्या मोजकीच लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली.

- Advertisement -

करोना संसर्गाचा गुणाकाराने होणारा फैलाव रोखण्यासाठी १ मे पासून देशात १८ वर्षापुढिल सगळ्याना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या पार्श्वभूमीवर राज्यानेही लसीकरणाची तयारी सुरु केली. मात्र, महाराष्ट्राला केंद्राकडून लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने १ मे पासून १८ वर्षापुढील प्रत्येकाला लस मिळेल का याबाबत शंका होती. मात्र, उपलब्ध लसीचा नगण्य संख्या लक्षात घेता मोजक्याच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या निर्णय घेतला आहे.

त्यानूसार नाशिक जिल्ह्यात सर्वत्र यासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारले जाणार नाहीत. जिल्हाप्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार फक्त जिल्ह्यातील पाच ठिकाणी ही लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. त्यासाठी रात्री उशीरा दहा हजार लसीचा स्टाॅक उपलब्ध झाला. सद्यस्थितीत ४५ वर्ष पूर्ण केलेल्यांचे लसीकरण सुरु आहे. मात्र लसीचे पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची गती मंदावली असल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या