Friday, May 3, 2024
Homeनगरगोमांस प्रकरणी श्रीरामपुरात तिघांना घेतले ताब्यात

गोमांस प्रकरणी श्रीरामपुरात तिघांना घेतले ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील वॉर्ड नं. 2 मधील गोल्डन मॅनच्या पाठिमागे एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये

कत्तल केलेले गोवंश जातीचे 450किलो गोमांस श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील वॉर्ड नं. 2 मधील गोल्डन मॅनच्या पाठिमागे एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती प्रभारी आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी त्यांनी स्वतः छापा टाकून सदर ठिकाणाहून 450 किलो अंदाजे 63 हजार रुपये किंमतीचे गोमांस पोलिसांनी जप्त केली. यात पोलिसांनी वसीम इसाक कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), रिजवान इस्माईल कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), फय्याज अयान कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

तिघे महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास व मांस विक्री करण्यास कायद्याने बंदी असतानाही विक्री कण्याच्या उद्देशाने गोमांस जवळ बाळगतांना मिळून आले. प्रभारी पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अमोल वसंत गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पोलिसाीं गुन्हा रजि. नं. 2166/2020 प्रमाणे सीम इसाक कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), रिजवान इस्माईल कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), फय्याज अयान कुरेशी यांचेविरविध्द भादंवि कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कायदा कलम 5 (ए) (बी) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक बैसाणे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या