Friday, May 3, 2024
Homeनाशिकतीनशे करोना रुग्णांवर घरीच उपचार सुरू

तीनशे करोना रुग्णांवर घरीच उपचार सुरू

नाशिक । Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असला तरी यात फारशी लक्षणे नसलेल्या करोना पॉझिटीव्ह रुग्णावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार अशा रुग्णांवर घरी उपचारास मुभा देण्यात आली असुन अशा शहरातील 300 रुग्णांवर घरीच उपचार सुरू असुन डॉक्टरांच्या पथकांकडुन दैनंदिन तपासणी केली जात आहे.

आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करोना पॉझिटीव्ह असलेले आणि फारशी लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी सुविधा असल्यास याठिकाणी उपचार करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अशा रुग्णांकडुन त्यांच्या घरी सोय असल्यासंदर्भात व घरीच उपचार घेण्यासंदर्भात सहमती फॉर्म भरुन घेऊन त्यांच्यावर त्यांच्या घरात उपचार सुरू करण्यात आले आहे.

अशाप्रकारे महापालिका क्षेत्रातील बाधीत 300 रुग्णांवर घरीच उपचार घेत आहे. मात्र अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात केले जाणार्‍या उपचाराप्रमाणेच त्यांच्या घरी जाऊन महापालिका पथकांकडुन त्यांच्या तपासणी केली जाते, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच त्यांच्याजवळ ताप मोजण्याचे थर्मल स्कॅनींग मशिन व शरिरातील आक्सीजनचे प्रमाण मोजण्यासाठी असलेले ऑक्सीमीटर असणे आवश्यक आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात रुग्ण वाढीचे नव नवीन उच्चांक होत आहे. तसेच संशयितांचा आकडा वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी करण्यासाठी आयसीएमआरच्या निर्देशाचा आधार घेऊन करोना बाधीत रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या