Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVirar Building Collapsed : विरारमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Virar Building Collapsed : विरारमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; अनेकजण जखमी

मुंबई | Mumbai

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) विरार (पूर्व) भागात मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून (Building Collapsed) भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ लोक मलब्याखाली अडकल्याने जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी (Accident) चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यामुळे घरामध्ये आनंदांचे वातावरण होते. मात्र, अचानक इमारतीचा एक भाग कोसळला आणि मोठा मलबा खाली आला. त्यात तिघांचा मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) तसेच स्थानिक प्रशासनाने दाखल होत बचावकार्य सुरु केले. यानंतर जखमींना बाहेर काढून विरार आणि नालासोपरा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .

मृतांची नावे

उत्कर्षा जोविल वय १ (मयत )

आरोही ओंकार जोवील वय २४ (मयत )

एकाचे नाव कळू शकलेले नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...