नाशिक | प्रतिनिधी Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज नागपूर च्या राज भवनात पार पडत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येत आहे.
- Advertisement -
नाशिक जिल्ह्यात्तून तीन आमदारांनी आज नागपूरच्या राजभवनात मंत्री पदाची शपथ घेतली आहे यात सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे, तर दिंडोरी पेठ मतदार संघातून निवडणून आलेले नरहरी झिरवाळ आणि मालेगाव बाह्य मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.