Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबस - ट्रॅक्टर अपघातात तीन जण गंभीर जखमी

बस – ट्रॅक्टर अपघातात तीन जण गंभीर जखमी

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

तालुक्यातील डोंगरगाव शिवारात येवला – भारम रोडवर राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि ट्रॅक्टर यांचेत झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी, (दि. २४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

येवला आगाराची येवला – रहाडी (क्रमांक एम एच २० बीएल ०२३८) ही बस येवल्याकडून डोंगरगाव कडे जात असताना, डोंगरगाव कडून तळवाडेकडे येणाऱ्या ट्रॅक्टर व बसची समोरा समोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टरवरील हुसेन बहादुर पटेल, फिरोज मेहबूब पटेल, सलमान पटेल रा. तळवाडे ता. येवला हे गंभीर जखमी झाले.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर सामाजिक कार्यकर्ते देविदास भोसले यांनी जखमींना तातडीने येवला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...