Thursday, May 2, 2024
Homeजळगावभाजपला धक्का : जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध

भाजपला धक्का : जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध

जळगाव – jalgaon

जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. यात महाविकास आघाडीतील तीन उमेदवाराची निवड बिनविरोध निश्‍चित झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली होती. मात्र कॉंग्रेससह राष्ट्रवादीने भाजपसोबत लढण्यास नकार दिल्याने भाजपने २१ जागांवर स्वबळाचा नारा दिला होता. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. भाजपकडून सर्वच जागांवर अर्ज दाखल करण्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे पारोळा विका सोसायटीतून आ.चिमणराव पाटील, एरंडोल विकास सोसायटीतून अमोल चिमणराव पाटील तर राष्ट्रवादीचे धरणगाव विका सोसायटीतून अर्ज दाखल केलेले संजय पवार यांची निवड बिनविरोध निश्‍चित झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या