Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! प्रेमप्रकरणातून चालकाकडून तिघींची हत्या

धक्कादायक! प्रेमप्रकरणातून चालकाकडून तिघींची हत्या

मुंबई । Mumbai

येथील कांदिवली पश्चिममध्ये (Kandivali west) एका चालकाने आई आणि तिच्या दोन मुलींची हत्या (Murder) करून स्वत: आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणातून (Love affair) हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे मृत महिलेच्या (woman) मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरुन आई मुलगी आणि चालक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चालकाने आधी मुलीच्या आईची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर स्वत:चे आयुष्य संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी (Kandivali police) घटनास्थळी दाखल होत सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या