Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यादेवदर्शनासाठी जात असताना तरुणांवर काळाचा घाला; सिन्नर तालुक्यातील तिघांचा मृत्यू

देवदर्शनासाठी जात असताना तरुणांवर काळाचा घाला; सिन्नर तालुक्यातील तिघांचा मृत्यू

नांदूर शिंगोटे | प्रतिनिधी | Nandur Shingote

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) चास (Chas) येथील ९ तरुण (Youth) खाजगी जीपने तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना तुळजापूरजवळील तामलवाडी शिवारात सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाल्याने त्यातील तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर अन्य ५ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यावर (Sinnar Taluka) शोककळा पसरली आहे…

- Advertisement -

अजित पवार-दादा भुसेंमध्ये अधिवेशनात खडाजंगी; काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, चास येथील ९ तरुण खासगी जीपने सोमवारी (दि.२०) रात्री १० च्या दरम्यान चास येथून तुळजापूरकडे (Tuljapur) रवाना झाले होते. तूळजापूर अवघे १५ मिनीटांच्या अंतरावर राहीले असतांना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. जीपचे टायर फुटल्याने सोलापूर-तुळजापूर रोडवरील तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ जीप रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

त्यात अनिकेत बाळासाहेब भाबड (२२), अथर्व (श्याम) शशिकांत खैरनार (२२), निखील रामदास सानप (२१) रा. तिघेही चास यांचा मृत्यू झाला. तर गणेश नामदेव खैरनार (३२), पंकज रविंद्र खैरनार (३०), जीवन सुदीप ढाकणे (२५), तूषार दत्तात्रय बिडगर (२२), दिपक बिडगर (२४) सर्व रा.चास हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (Solapur Government Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अन् आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात पिकला हशा; फडणवीस म्हणाले, आम्ही…

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह (Dead Body) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर तामलवाडी पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी येत पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.आज (दि.२१) रात्री उशिरा चास येथील म्हाळुंगी नदीच्या तीरावर तीनही तरुणांवर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या