Friday, May 3, 2024
Homeनगरटिंग्या टोळीला दोन दिवस पोलीस कोठडी

टिंग्या टोळीला दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टिंग्या टोळीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करीत आहे.

- Advertisement -

भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा. चितळेरोड, अहमदनगर) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता. त्यांच्याकडील अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली होती. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली होती. तरोटे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी टिंग्या ऊर्फ गणेश म्हसूदेव पोटे (रा. सारसनगर) व त्याचे साथीदार ऋषिकेश प्रदीप लड्डे, यश किरण पवार (दोघे रा. सिव्हील हाडको, सावेडी), अक्षय उमाकांत थोरवे (रा. पाईपलाई रोड, सावेडी) यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते.

त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी उपनिरीक्षक दुर्गे यांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दुर्गे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, अभय कदम, दिपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, प्रशांत बोरूडे, नितीन शिंदे, राठोड यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या