नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात दिवसभरात ५१ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २१ रूग्णांनी करोनावर मात केली.
- Advertisement -
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ५१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ३४ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १३ तर, जिल्हा बाह्य ०४ रुग्णाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील ०२ रुग्णांचा समावेश आहे . आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या ८ हजार ६९४ इतकी झाली आहे.