Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज 2 हजार 992 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 7 हजार 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज

- Advertisement -

देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 19 लाख 43 हजार 335 झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.58 टक्के आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 20 लाख 33 हजार 266 झाली आहे.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे 51 हजार 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 37 हजार 516 आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,47,64,744 नमुन्यांपैकी 20 लाख 33 हजार 266 नमूने (13.77 टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 82 हजार 181 जण गृह विलगीकरणात तर 2 हजार 93 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या