Thursday, May 21, 2026
HomeनगरAhilyanagar : तोफखाना पोलीस ठाण्याच्या दोन अंमलदारांवर हल्ला

Ahilyanagar : तोफखाना पोलीस ठाण्याच्या दोन अंमलदारांवर हल्ला

वाहतूक सुरळीत करताना कल्याण रस्त्यावरील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कल्याण रस्त्यावरील रेल्वे पुलावर गुरूवारी (11 डिसेंबर) सकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अंमलदारांना स्थानिक सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पोलीस अंमलदार जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे असे जखमी अंमलदारांची नावे आहेत. भापसे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव दिलीप गडाख, अक्षय दीपक राठोड, दिगंबर बंडु कांडेकर, निखील नारायण होळकर, सचिन बाळासाहेब गडाख (सर्व रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) व इतर दोन ते तीन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरूवारी सकाळी भापसे व बर्डे हे कल्याण रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवित असताना एक मोपेड मार्गात लावलेली दिसली. ही मोपेड हटविण्यास सांगितल्यावर प्रणव गडाख हा भडकून तु कोण सांगणारा? अशी उर्मट भाषा करत पोलिसांची ओळखपत्रे दाखवूनही सहकार्याला नकार दिला. प्रणव गडाखने अचानक भापसे यांच्या हातातील मोबाईलवर फाईट मारत व्हिडीओ काढण्यास विरोध केला. त्याचवेळी त्याने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही मिनिटांतच इतर साथीदार दुचाकीवरून घटनास्थळी येऊन थेट पोलिसाला लक्ष्य केले. भापसे यांना खाली पाडले व मारहाण केली.

टणक हत्याराने कान, जबडा, डोळ्यावर प्रहार केला. झटापटीत गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली. बर्डे यांना देखील मारहाण करून जखमी केले. मारहाणीत भापसे गंभीर जखमी झाले आहेत. संशयित आरोपींनी कर्तव्य बजावणार्‍या पोलीस अंमलदारांना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला केल्याने कायदा-सुव्यवस्थेलाच आव्हान देण्यात आले आहे.

पाच संशयित ताब्यात
सदरचा प्रकार बर्डे यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार सुरज वाबळे, सुधीर खाडे, रवी घुंगासे, सतिष त्रिभुवन व इतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारहाण करणार्‍या पाच संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...