Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारतोरणमाळ परिसर बनलाय रंगीबेरंगी पक्ष्यांचे आश्रयस्थान

तोरणमाळ परिसर बनलाय रंगीबेरंगी पक्ष्यांचे आश्रयस्थान

शहादा – Shahada – ता.प्र :

एकाबाजूला पावसाने पाठ फिरवली आहे मात्र दुसर्‍या बाजूने पावसाळ्यापूर्वीच वुङनिफ पक्षासह रंगीबेरंगी दिसणारे पक्षी मात्र तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी परिसरात येऊन दाखल झाले आहेत .

- Advertisement -

तेदेखील पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत पावसाळी वातावरण निसर्गरम्य दृश्य अद्याप पूर्णता बहरले नसल्याने पर्यटकांची संख्यादेखील कमी झाली आहे पण पक्षी दाखल झाले आहेत

तोरणमाळ परिसरात जंगलात हिरवा मुकुट असलेला वुङनिफ पक्षी दाखल झालेला आहे रंगीबिरंगी दिसणारे हे पक्षी सातपुड्याच्या जंगलात दिसत आहेत.माहिती मिळवली असता पावसाळ्याच्या आगमनापूर्वी हे पक्षी तोरणमाळ परिसरात दाखल होतात डिसेंबर वास्तव्यात असतात.

या पक्षाच्या डोक्याचे भागावर हिरवा मुकुट सारखा आकार असतो धारदार अशी चोच असते कावळ्या पेक्षा याच्या आकार मोठा असतो पावसाळी वातावरणात वास्तव्य करतात तोरणमाळ भागातील आश्रम शाळेतील शिक्षक प्रदीप गणेश पाटील यांनी या पक्षाचे छायाचित्र टिपले आहे हा पक्षी रंगीबेरंगी असल्याने अधिक मोहक वाटतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या