Tuesday, April 22, 2025
HomeनगरAccident News : ट्रॅक्टर दरीत कोसळून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : ट्रॅक्टर दरीत कोसळून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असलेल्या बेलसोंडावाडी येथे मंगळवारी (दि.22) सकाळी 10 वाजता दरीमध्ये ट्रॅक्टर कोसळून (Tractor Accident) तुकाराम गोविंद घुले या शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. तर त्याच्यासोबत असलेला सीताराम गणपत घुले हा शेतकरी गंभीररित्या जखमी (Injured) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडावाडीकडे ट्रॅक्टरद्वारे तुकाराम घुले हे पाणी घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा टायर फुटून 200 फूट दरीत (Valley) कोसळला. वस्तीवरील ग्रामस्थांना ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा आवाज आल्यानंतर डॉ. जवरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, राजेंद्र घुले, राहुल घुले, उपसरपंच नामदेव घुले, ग्रामसेवक प्रमोद जाधव आदिंसह ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. त्यानंतर दोनशे फूट दरीतून झोळी करून ग्रामस्थांनी मृतदेह वर काढला. तर सीताराम घुले या शेतकर्‍याला उपचारार्थ संगमनेरातील (Sangamner) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी बेलसोंडा वस्तीकडे धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, पठारभागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. वाड्यांकडे जाणारे रस्ते खराब असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. अशातच पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागते. या दुर्दैवी घटनेने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

हुसैन

Nashik News: काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांना अटक व सुटका; सातपीर...

0
नाशिक | प्रतिनिधी काँग्रेस नेते माजी खा.हुसैन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या नियोजनाप्रमाणे दुपारी ते द्वारका भागातील हजरत सातपीर दर्गा येथे ज्या ठिकाणी...