Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ‘ट्रेड्स इन्वेस्टमेंट’ कंपनीचे दोन संचालक अटकेत

Ahilyanagar : ‘ट्रेड्स इन्वेस्टमेंट’ कंपनीचे दोन संचालक अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या ट्रेड्स इन्वेस्टमेंट प्रा. लि. व संबंधित कंपन्यांच्या बहुचर्चित फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन संचालकांना अटक केली आहे. गुरूवारी (15 जानेवारी) पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांना आज, शुक्रवारी श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी पक्षाकडून मागणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे सचिन लक्ष्मण खडतरे (वय 38, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि प्रसाद प्रकाश कुलकर्णी (वय 35, रा. नांदेड सिटी, पुणे) अशी आहेत. हे दोघेही या फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित अगस्त मिश्रा याचे निकटवर्ती असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सिस्पे, ट्रेड्स इन्वेस्टमेंट, इनफिनाईट बिकन आदी विविध कंपन्यांच्या माध्यमातून नवनाथ औताडे, अगस्त मिश्रा व अन्य संचालकांनी मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रूपयांची रक्कम गोळा केली.

मात्र, ठरलेल्या मुदतीत परतावा न देता तसेच मुद्दलही परत न करता हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत एकूण चार गुन्हे दाखल असून, त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन संचालकांसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये काही एजंटांचाही समावेश आहे. दरम्यान, गुरूवारी खडतरे व कुलकर्णी यांना पुणे येथून ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. हे दोघेही मुख्य सूत्रधार अगस्त मिश्राचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने, त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ramdas Athawale : बरं झालं शिर्डीत हरलो…

0
सांगली | Sangli केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतील पराभवावर विनोदी टोलेबाजी केली. ‘बरं झालं मी हरलो, नाहीतर काँग्रेससोबत राहावं लागलं असतं,’ असं म्हणत त्यांनी काँग्रेस...