Friday, May 3, 2024
Homeनाशिकजीपीओ रोडची चारचाकी धारकांना धास्ती

जीपीओ रोडची चारचाकी धारकांना धास्ती

नाशिक। प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागाची खर्‍या अर्थाने नाळ जोडलेले मिनी मंत्रालय अर्थातच जिल्हा परिषद मुख्यालय ( Zilla Parishad Headquarter Road) आणि येथील परिसर हा वाहनांच्या भाऊगर्दीने (With a rush of vehicles ) नेहमीच बहरलेला,फुललेला राहत असल्याने या भागात अन् तेही चार चाकी वाहनाने जायचं म्हटलं की, ‘नको रे बाप्पा’ अशीच प्रतिक्रिया ग्रामीण भागातून अनेकांची असते.त्यामुळे येथे यायचे तर एक तर बसने नाही तर चार चोघे मिळून चार चाकीने यायलाच प्राधान्य दिले जात आहे.असे दैनंदिन चित्र आहे.

- Advertisement -

त्रंबक नाका सिग्नल ते जिल्हा पोस्ट ऑफिस या रस्त्याला वाहनांनी गराडा घातल्याचे चित्र दररोज बघावयास मिळते. हा रस्ता म्हणजे सार्वजनिक सुविधा पुरविणार्‍या कार्यालयांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून ठक्कर बाजार,जिल्हा रुग्णालय, जिल्हा पोस्ट ऑफिस, महावितरण कार्यालय,विविध सहकारी,राष्ट्रीयकृत बँका, शाळा, हॉस्पिटल ब्लड बँक अशा महत्त्वाच्या संस्थांना जोडण्यासाठी हा रस्ता म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जोडणारा दुवा आहे.

या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि वाहनांची वर्दळ कमी व्हावी, याकरिता या रस्त्यावर त्रंबक नाका सिग्नल आणि अण्णाभाऊ साठे पुतळा अशा दोन ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे आवश्यक आहे.तसेच वाहतूक कमी करण्याकरिता येथे उड्डाणपुलाची नितांत गरज आहे तशी मागणी विशेषत ग्रामीण भागातून येणार्‍या ग्रामस्थांकडून होत आहे.

या मार्गावर अ‍ॅक्सिस बँक, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था,अभियंता पतसंस्था, फेडरल बँक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, बँक ऑफ पटियाला, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी बँक अशा सहकारी, निम सरकारी व राष्ट्रीयकृत बँका असल्याने खातेदारांची मोठी वर्दळ असते.

डोळ्यांचे बिर्ला आय हॉस्पिटल, चिरंजीवी हॉस्पिटल, ब्लड बँक, वाईन शॉप, तीन पेट्रोल पंप, जिल्हा परिषद मुख्यालया मागे असलेले स्त्री रोग तज्ञ हॉस्पिटल, महावितरण कार्यालय, सोसायट्यांची नोंदणी कार्यालय (फेडरेशन), जवळच असलेला मॉल,जिल्हा रुग्णालय, ठक्कर बाजार अशा महत्वाच्या केंद्राना जोडणारा रस्ता.

* जिल्हा परिषद आवारात पार्किंगची व्यवस्था नसल्याने जिल्हा परिषद गेटच्या दुतर्फा नियमित होणारी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगचा फटका वाहतूक कोंडीवर होतो.

* जिल्हा परिषद आवारात ठेकेदारांच्या वाहनांना जागा मात्र,सेवकांच्या वाहनांना पार्किंगसाठी बाहेरचा रस्ता.

* जिल्हा परिषद आवारात केवळ अधिकारी व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या वाहनांनाच पार्किंगला जागा देणे गरजेचे.

* जवळच असलेल्या कालिदास कलामंदिरात समोरील मनपाच्या वाहनतळावर चार चाकी वाहनांसाठी पार्किंगचा वापर वाहनधारकांनी केल्यास या रस्त्यावरील वाहतुकीवरील कोंडी कमी होण्यास निश्चित मदत होईल.

* जिल्हा परिषद मुख्यालयात दिव्यांग कार्यालय असल्यामुळे येथे येणार्‍या दिव्यांग बांधवांना सर्टिफिकेट घेण्यासाठी आल्यानंतर आपले वाहन लावणे जिकरीचे होते.

* ज्यावेळी महानगरपालिकेने या रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचे वा रस्त्याचे काम सुरू केल्यास या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होते.

* सायंकाळी व सकाळी कार्यालयीन वेळ सुरू व सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावर अपघातांना आमंत्रण मिळते.त्यातही कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर महिला सेविकांना आपल्या दुचाकीवरून जाताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते

* या भागात रस्त्यावर सिगारेटचा झुरका घेत चहा प्रेमींचीही संख्या मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे येथे त्यांची अन त्यांच्या दुचाकींचा अस्तव्यस्त पार्किंग नित्याची झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या