Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रNandurbar Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला! भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच...

Nandurbar Accident : ऐन दिवाळीत काळाचा घाला! भीषण अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू

नंदुरबार । Nandurbar

ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात (Nandurbar Accident) घडला आहे. अस्तंबा यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पीकअप वाहनाचा चांदशैली घाटात नियंत्रण सुटल्याने ते खोल दरीत कोसळले. या अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, दहाहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

स्थानिक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अस्तंबा यात्रा आटोपून काही भाविक एका पीकअप वाहनाने आपल्या गावी परतत होते. हे वाहन चांदशैलीच्या अवघड घाटातून जात असताना, तीव्र चढण चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन थेट काही मीटर खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.

YouTube video player

अपघातात गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे सहा भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच, वाहनात बसलेले दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना पुढील उपचारांसाठी इतर मोठ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली जात आहे. पोलीस सध्या बचाव कार्य आणि मदतकार्यात व्यस्त आहेत.

या अपघातामागील प्राथमिक कारण म्हणून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. अपघाताग्रस्त पीकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (Overloaded Vehicle) भरण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. सातपुडा पर्वतरांगेतील चांदशैली घाट हा अत्यंत अवघड घाट मानला जातो. या घाटात अनेक धोकादायक नागमोडी वळणे आणि तीव्र चढ-उतार आहेत. अशा मार्गांवर मर्यादित प्रवासी घेऊन जाणे बंधनकारक असताना, या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसते आहे. याच अति-प्रवाशांच्या भारामुळे तीव्र चढणीवर गाडीवरचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

अस्तंबा यात्रा ही आदिवासी समुदायासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची यात्रा असते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात. दिवाळीच्या काळात ही यात्रा भरते. यात्रेतून परतताना भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु केले असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून आवाहन: अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या दुःखद घटनेमुळे नंदुरबार परिसरात दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...